‘या’ अभिनेत्रीच्या “बिंदी आणि बिकनी” फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ, पाहा फोटो

मुंबई| बाॅलिवूडपासून तर हाॅलिवूड पर्यंतचा खडतर प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. तिनं आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. आज प्रियंका ही एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रियंका ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सध्या ती बाॅलिवूडमध्ये काम करत नसली तरी तिची चर्चा मात्र होत असते.

काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे चर्चेत होती. तर त्यानंतर ऑपेरा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शोमध्ये तिने हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. प्रियांकाने नुकतच अमेरिकेत ‘सोना’ तिचं पहिलं भारतीय हॉटेल सुरु केलंय. तिच्या या हॉटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिनं एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

प्रियांकाने तिचा एक जुना बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती 19 वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. बिकनीतील हा फोटो शेअर करत प्रियांने दिलेल्या कॅप्शनने चर्चा रंगत आहेत. “लाजणं? त्याबद्दल कधी एकलं नाही.” असं कॅप्शन देत या फोटोला तिने “बिंदी आणि बिकनी” असं हॅशटॅग दिलं आहे.

प्रियंका चोप्राच्या या जुन्या फोटोनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती फारच वेगळी दिसत असून या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. प्रियंकानं शेअर केलेला हा फोटो ती जेव्हा माॅडेलिंग करायची त्या वेळेसचा आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

‘आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे’;…

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही…

मोठी बातमी! आता ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’…

अळूची पाने खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या…