Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड

नवी दिल्ली | तरूणांमध्ये गाड्यांची सर्वात जास्त क्रेझ असतं. राॅयल इनफिल्डला (Royal Enfield )दुचाकी गाड्यांच्या दुनियेतलं बादशाह समजलं जातं. आता कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाईक लाँच केली आहे, ज्याची बुकिंग ओपन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटांत विक्रीचा बोर्ड ( Sold Out) लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विक्री झालेल्या Twin Anniversary Edition च्या सर्व युनिट Royal Enfield ने अलीकडेच आपली 650 Twin Anniversary Edition लाँच केली होती.

संपूर्ण जगासाठी कंपनीने त्याचे फक्त 480 युनिट्स बनवले आहेत. यामध्ये भारतीय बाजारपेठेसाठी फक्त 120 युनिट्स सादर करण्यात आले होते.

कंपनी Royal Enfield या वर्धापन दिनानिमित्त स्पेशल आणि ओरिजिनल अॅक्सेसरीज किट देखील देत आहे. तसेच, 3 वर्षांच्या वॉरंटी व्यतिरिक्त, चौथ्या आणि पाचव्या वर्षांसाठी एक्सटेंडेट वॉरंटीचा ऑप्शन देखील मिळेल.

भारतात बाईकचे 6 डिसेंबर रोजी बुकिंग सुरू होताच, सर्व युनिट्स केवळ 2 मिनिटांत विकले गेल्याचं कळतंय कंपनीने Royal Enfield ला 120 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पेशल एडिशन लाँच केली आहे.

दरम्यान, रॉयल इनफिल्डची बाईक इतकी प्रसिद्ध आहे की प्रत्येकाला ती हवी असते. या कंपनीच्या बाइक्सना भारतातच नाही तर देशांतही खूप पसंती मिळाली. लांबच्या राइड्स दरम्यान लोकांना रॉयल इनफिल्ड क्लासिक आणि हिमालय आवडतात.

ही कंपनी कधी आणि कशी सुरू झाली असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कंपनी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. ही कंपनी 1891 मध्ये सुरू झाली. त्यावेळी ही कंपनी सायकली बनवायची.

1898 मध्ये, कंपनीने पहिले चार चाकी मोटार वाहन तयार केले. त्यावेळी कंपनीचं नाव होतं The Enfield Cycle Co. Ltd, जे 75 वर्षे टिकले. त्यानंतर 1901 मध्ये कंपनीने पहिल्यांदा मोटरसायकल बनवली. बॉब वॉकर स्मिथ आणि फ्रेंच व्यक्ती ज्युल्स गोबिएट यांनी या मोटरसायकलची रचना केली होती. लंडनमध्ये होणाऱ्या स्टॅनले सायकल शोमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार” 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर 

Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला 

पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा 

“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत”