बिजींग | लग्न म्हणजे सर्वांच्याच आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. लग्नामध्ये अनेक नव्या नात्यांची सुरुवात होते. अनेक नवी माणसं जोडली जातात. या दिवशी दोन अनोळखी व्यक्ती थोरा मोठ्यांच्या आशिर्वादाने आणि देवा ब्राह्मनाच्या साक्षीने सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतात.
चीनमधील बिजींग शहरात देखील असाच एक लग्नसोहळा पार पडत होता. मात्र, या लग्नसोहळ्याच्या दिवशी नवरदेवाच्या आईची नजर नवरीच्या हातावर पडली आणि हा विवाह सोहळा जागीच थांबला. ही नवरी नवरदेवाचीच 20 वर्षांपूर्वी हरवलेली बहीण निघाली आणि उपस्थित सर्वांना एकंच धक्का बसला.
ही घटना चीनमधील जिआनग्सू प्रांतातील सोझोउ येथे घडली आहे. माहितीनुसार, 20 वर्षांपूर्वी नवरी असणारी मुलगी हरवली होती. यानंतर तिच्या आई वडिलांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती सापडली नव्हती.
आपल्या पोटची मुलगी ना सापडल्याने त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याचा सांभाळ केला. आता याच मुलाचं लग्न आपल्या हरवलेल्या मुलीशी ठरत होतं, याची कोणालाही पुसटशी कल्पना देखील नव्हती.
लग्नाचा विधी चालू असताना नवरदेवाच्या आईची नजर नवरीच्या हातावर पडली. यावेळी तिला नवरीच्या हातावर आपल्या हरवलेल्या मुलीची एक खून दिसली. यानंतर नवरदेवाच्या आईने नवरीचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांकडे याबद्दल चौकशी केली.
यानंतर अशी माहिती समोर आली की, ही मुलगी लहान असताना रस्त्यावर पडलेली सापडली होती. त्यानंतर त्यांनी तिचे संगोपन केले. मात्र, ही गोष्ट मुलीला माहीत नव्हती.
हे सर्व प्रकरण समोर येताच मुलीच्या खऱ्या आईने आणि मुलीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वचजण भावूक झाले.
दरम्यान, होणारी सून आपली पोटची मुलगी असल्याचं समजल्यानंतर देखील हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कारण नवरदेव असणाऱ्या मुलाला देखील दत्तक घेण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं काही केलं की…, पाहा व्हिडीओ
राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे…
कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापट…
हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते…
‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…