वऱ्हाड निघालं लग्नाला! जमिनीवर लाॅकडाऊन, जोडप्यानं आकाशात बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

चेन्नई| सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढताना दिसत आहे. या व्हायरसमुळे अनेक लोकांचा मृत्यू होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

याकाळात अनेकांचे अरेंजमॅरिएज होतं तर काही-काहींचं लव मॅरिएज होतं. लग्न म्हणलं एक पवित्र बंधन. तसेच मुलगा आणि मुलीचे संसारिक जीवनाला सुरूवात होतानाचा समारंभ. तसेच लग्न म्हणलं की केवळ लग्न ठरलेले मुलगा-मुलगीचं त्या लग्नाशी जोडले जात नाहीतर. त्या दोघांच्या कुटुंबातील एकूण-एक सदस्य एकमेकांशी त्यांचे नातं जोडलं जातं.

मात्र आता कोरोनामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्यो अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कामकाज बंद राहणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला तसेच लग्नाचा समारंभाला केवळ 50 जणांनमध्येच होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

अशा परिस्थितीमध्ये एका कपलनं थेट आकाशात झेप घेत विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नातेवाईकांसोबत विमानातच त्यांनी लग्नगाठ बांधली.

तमिळनाडूच्या मदुराई येथे विमानात हे लग्न पार पडले. तमिळानाडूमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी 24 ते 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे या कपलनं चार्डर्ट विमानात वेगळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.

मदुराई येथे राहणाऱ्या राकेश आणि दिक्षा यांनी विमानामध्ये आपली लग्नगाठ बांधली. त्यांनी स्पाइसजेटचे एक चार्टर्ड विमान भाड्याने घेतलं होतं. त्यामध्ये 161 नातेवाईकांसोबत हवेमध्ये त्यांनी हे लग्न पार पाडले. लॉकडाउन लागण्याआधीच त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण केला. दोन तासांसाठी भाड्याने घेतलेल्या या विमानामध्ये त्यांनी बंगळुरू ते मदुराई आणि पुन्हा मदुराई ते बंगळुरू असा प्रवास केला होता.

लग्नात सहभागी झालेले सर्व 161 वऱ्हाडी यांची विमान प्रवासाआधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना विमान प्रवासासाठी परवानगी देण्यात आली होती, असं संबंधित खासगी विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या विवाहाची आता देशभर चर्चा सुरु असून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा…