“देशातली राजवट पाहून वाटतं त्यापेक्षा इंग्रज बरे होते”

पुणे | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. राणा दाम्पत्यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली.

देशद्रोहाच्या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली होती. मात्र आता राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे.

तब्बल 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्यांना दिलासा मिळाला आहे. आता यावरुनही राज्यात आरोप-प्रत्यारोप होत असलेले पहायला मिळत आहे.

पुण्यात शिवसेना मेळाव्यात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्याला हात घातलेला पहायला मिळाला.

राणा दाम्पत्यांवर टीकास्त्र सोडत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. ज्याप्रकारची राजवट सध्या देशात सुरू आहे ते पाहून असं वाटतंय की त्यापेक्षा इंग्रज बरे होते, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देशात सध्या दिलासा घोटाळा सुरु आहे. गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात. इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे.

पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”

राणा दाम्पत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं, म्हणाले…

 कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

  Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका

  ‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा