‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणूक आयोगानं मतदान कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानूसार उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी निवडणूक होणार आहे. परिणामी सध्या विविध राजकीय पक्ष आपापली तयारी जोरात करत आहेत.

सध्या उत्तर प्रदेशात भाजपची एकहाती सत्ता आहे. पण गेल्या काही दिवासांमध्ये भाजपमधील  आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाला रामराम ठोकायला सुरूवात केली आहे.

कधीकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकहाती सत्ता असणारा बहुजन समाजवादी पक्ष सध्या काहीसा मागं पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशात आता एक खळबळ माजवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

बसपचे नेते अरशद राणा यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अरशद राणा यांनी आपल्याला आपल्याच पक्षातील नेत्यांनी फसवल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली आहे,

बसपच्या नेत्यांनी आपल्याला तिकीट देतो म्हणून दिलं नाही. मुजफ्फरनगर स्थानकात राणा यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करत असताना राणा यांना रडू आवरल नसल्याचं त्या व्हिडीओत दिसत आहे.

बसपच्या नेत्यांनी आपल्याकडून तब्बल 67 लाख रूपये इतकी रक्कम घेतली पण आपल्याला तिकीट दिलं नाही, असा आरोप राणा यांनी केला आहे. परिणामी देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

राणा यांनी आपल्याला आपला पैसा वापस नाही मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. परिणामी सध्या बसप नेत्यांची काळजी वाढली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीपुर्वी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा काय कारवाई करताता हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ –

महत्वाच्या बातम्या –

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग