मुंबई | मुंबईत राहायला जागेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अशात इमारती देखील जुन्या झालेल्या असल्यानं दुर्घटनांची संख्या दररोज वाढत आहे.
मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आता आणखीन एक इमारत कोसळली आहे. परिणामी या इमारतीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे.
मुंबईत वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडल्यानं मुंबईकर हादरले आहेत. सध्या प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि सहा रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या जखमींना बाहेर काढण्याचं काम चालू आहे.
संबंधित घटना ही वांद्रे येथील बहरामपाडा या भागात घडली आहे. सदरिल चार मजली इमारत ही बेकायेशीर होती आणि इमारतीतील नागरिकांना याबाबत नोटीस दिल्याची माहिती आता समोर येत आहे.
सदरील इमारत ही खूप जुनी असल्यानं ही दुर्घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा भागात मोठा आवाज झाला. आसपासच्या नागरिकांनी लागलीच प्रशासनाला कळवलं होतं.
बचाव पथकाच्या माध्यमातून प्रचंड वेगानं काम चालू आहे. बचाव पथकानं आतापर्यंत 6 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.
जखमींना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. व्ही. एन. देसाई आणि वांद्रे येथील भाभा हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
महत्त्वाची बातम्या –
“मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा
“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल
भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन