सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग अन्……

नवी दिल्ली| सध्या कोरोना विषाणूपासून वाचण्याचे सतत प्रयत्न चालू आहे. हे टाळण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतरावर जोर देण्यात येत आहे. त्यामुळे मास्क, सामाजिक अंतर, हॅंन्ड सॅनिटायझर सर्व अत्यंत आवश्यक आहे.

सॅनिटायझरचा वापर आपल्याला काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कारण सॅनिटायझर मध्ये कमीत कमी 60 टक्के अल्कोहल असतं. त्यामुळे वेगाने आगीचा धोका वाढतो. परंतु बाहेर असताना नागरिकांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी सॅनिटायझर फायद्याच ठरतं.

अनेक लोक बाहेर जाताना आपल्यासोबत सॅनिटायझर ठेवतात. दुचाकीच्या डिक्कीमध्ये तर कारने प्रवास करत असताना, कारमध्ये सॅनिटायझर ठेवलं जातं. सॅनिटायझरचा वापर करताना काळजी घेण्याचं सांगितलं जातं, सॅनिटायझरमधील अल्कोहलमुळे आगीचा धोका असल्याने, अनेकदा आगीच्या संपर्कात येऊ नये असा सल्ला दिला जातो.

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच आपल्या छोट्याश्या निष्काळजीपणामुळे मोठा फटकादेखील बसू शकतो. अमेरिकेत अशीच एक घटना समोर आली असून सॅनिटायझरमुळे संपूर्ण कारच जळाल्याचं दिसून येत आहे.

अमेरिकेत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने स्मोक करता करता सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे त्यावेळी ही आग कारमध्ये लागली, अशी माहिती न्यूयॅार्क पोस्टकडून मिळाली आहे.

गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे एका कारच्या मालकाला कारमध्ये हॅंन्ड सॅनिटायझरचा वापर करणं चांगलंच महागात पडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाची कार संपूर्ण जळाली असल्याचं दिसतंय. कारमधून कार चालकाला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आग लागल्याचं कळताच अग्निशामक दल त्वरित घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, सॅनिटायझर ज्वलंत पदार्थ असल्याने त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच आपल्या मुलांना या बद्दलची माहिती द्या. लक्षात असू द्या की जर लहान मुलांनी सॅनिटायझर वापरले असल्यास ते आगीच्या संपर्कात येऊ नये.

 

महत्वाच्या बातम्या – 

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल…

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा…

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…

पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…