घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे, त्याचप्रमाणे भावूक करणारेही असतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक मांजर आपल्या मालकिनीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं आहे.

आपल्याला माहित आहे की, बऱ्याच लोकांना आपल्या घरात पाळीव प्राणी पाळायची खूपच आवड असते. तसं पाहिलं तर अनेकांच्या घरामध्ये मांजरच पाळली जाते.

अशातच याच संदर्भात सोशल माडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका मांजरीने घरातील लहान मुलाला वाचवलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका घरामध्ये एक लहान मुल खेळत असतं. त्या ठिकाणी एका खुर्चीमध्ये एक मांजरही बसलेली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. लहान बाळ खेळता-खेळता जिन्याच्या पायऱ्यांपाशी जात आणि त्याचा तोल जाणार तेवढ्यात ती मांजर त्या बाळाला पाहते आणि तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्याला आपल्या दातांनी त्याचा शर्ट पकडून मागे खेचते.

त्या मांजरीच्या जागृकपणामुळे एक अपघात टळला असल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होत आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत या व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलं असल्याचं समजतं आहे.

https://twitter.com/aflyguynew1/status/1440818304990396417?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1440818304990396417%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fcat-saves-baby-from-falling-down-from-stairs-video-goes-viral-on-social-media-mhkp-612667.html

महत्वाच्या बातम्या-

शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ

‘मम्मी मै क्या कुत्ते का बिस्किट खाऊ?’ पाहा तुरूणाचा मजेशीर व्हिडीओ

मालकिनीला वाचवण्यासाठी चक्क कुत्र्याने केला जिवापाड प्रयत्न, पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

अभिनेत्री मानसी नाईकने ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल