“केंद्र सरकार राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे”

मुंबई | कोरोनाकाळात राज्य सरकर आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चांगल्याच रंगल्या आहेत. केंद्राकडून राज्य सरकारला निधी मिळणार होता, तो निधी अजूनही मिळाला नाही. तसेच राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कर्ज काढा, असं सांगण्यात आलं होतं, यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारकडून २२ हजार कोटींचा निधी मिळणार होता. मात्र, अद्याप केंद्राकडून राज्याला निधी आला नाही. पण केंद्राकडून राज्यानं कर्ज काढावं, असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच केंद्र सरकार राज्याला हक्काचे पैसे तर दूरच मात्र कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. अशा महाभयान संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा मार्ग देशाला दाखवला. त्यानंतर नागरिकांना आत्मनिर्भर होण्यास सांगितलं. म्हणजेच सगळ्या नाड्या आवळायच्या आणि श्वास घ्या असं सांगायचं, अशी घणाघाती टिका करत ठाकरे यांनी थेट मोदींवर निशाणा साधला आहे.

कोरोना संकट हे तोंडी लावण्यासाठी आहे, हे ठीक आहे. मात्र, वस्तू आणि सेवा कराची मांडणी जर का चुकिची असेल तर यावर चर्चा कोण करणार आहे? विरोधी पक्ष आहात म्हणून आमच्यावर टीका करत आहात, हे ठीक आहे. मात्र, आपण मराठी मातीची लेकरं आहोत. महाराष्ट्रासाठी आपण एकवटून कधीतरी केंद्राला जाब विचारणार आहोत की नाही?, असा सवालही ठाकरे यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

संकट काळात आपण एकत्र येणार नसू तर मग केव्हा एकत्र येणार? १५ तारखेपासून आपण या महामारीचा सामना अधिक आक्रमकपणे करणार आहोत. या संकटाला आपण सर्वांनी मिळून सामोरं जायचं आहे. यासाठी मला तुमची गरज आहे, असंही ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी बाजी मारली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेनं बाजी मारल्यानं भाजप नेते चांगलेच नाराज झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली आहे”

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! अखेर सुशांतची ‘ही’ गर्लफ्रेंड गजाआड; इतर दिग्गजही अडकणार जाळ्यात?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला नाट्यमय वळण; सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तिविरोधात तक्रार

पुण्यात लग्नात जेवताना ‘ही’ गोष्ट करण्यास मनाई; जाणून घ्या सर्व नव्या अटी!

चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न