Top news महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण; सरकार कुणाचं याचा विचार करु नये- अशोक चव्हाण

मुंबई |  महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असल्याने केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत राज्याला दिली पाहिजे. कोणाचे सरकार आहे, याचा विचार करू नये, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते लोकसत्ताच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

मोदी सरकारने टाळेबंदी लागू करताना देशाला त्याची पूर्वकल्पना द्यायला हवा होता. म्हणजे देशातल्या नागरिकांना वेळ मिळाला असता. अडकलेले लाखो नागरिक घरी पोचू शकले असते, असं म्हणत केंद्राने घाईघाईत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केल्याचं चव्हाण म्हणाले.

राज्यात रुग्णसंख्या अधिक असताना व उत्पन्न बंद असताना केंद्राने मोठी आर्थिक मदत व पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आदी वैद्यकीय सामग्री द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

केंद्राने चर्चा न करता अचानक निर्णय जाहीर केला. अडकलेल्या लाखो लोकांची दीर्घकाळ सोय करणं सोपं नसतं. एक ते दोन आठवडे उत्साह असतो उत्साहाच्या भरात ते शक्यदेखील होतं. मात्र आता अडकलेल्यांचे हाल होत आहेत. परराज्यातील मजुरांकडचे पैसे संपत आले, असं सांगत रेल्वेने त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितले, ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. आता काँग्रेसकडून त्यांना आता मदत केली जात आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!

-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”

-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत