नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षापासून कोरोना महासाथीच्या रोगानं हाहाकार माजवला आहे. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं कहरच केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. कोरोनाती तिसरी लाट ओसरताना दिसत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सगळ्याच कंपन्यांनी वर्क फ्राॅम दिलं होतं. कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारी कर्मचारीही घरुन काम करत होते. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक बातमी समोर येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातील 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्राॅमं बंद होणार आहे. 7 फेब्रुवारीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित रहावं लागणार आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या आता कमी होत चालली आहे. त्यामुळे निर्बंधामध्येही शिथिलता पहायला मिळत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ह्युंदाईला पाकिस्तानचा पुळका, भारतीयांनी ‘असा’ उठवला बाजार!
नितेश राणे यांना मोठा झटका; कोठडीत मुक्काम वाढला
लतादिदी अनंतात विलीन; अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह अनेकांची हजेरी
“मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाहीये”
ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं! वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार