खेळ

अन् पाकिस्तानला आपला गाशा गुंडाळून आता घरी जावं लागणार…!

लंडन |  आज पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश क्रिकेट विश्वचषकातला अटीतटीचा सामना होत आहे. त्यापूर्वी पाकिस्तानची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशपुढे 315 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानला केवळ ही मॅच जिंकणं पुरेसं नव्हतं. तर चांगल्या रनरेटने मॅच जिंकावी लागणार होती.

बांगलादेशने सात धावा करताच पाकचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार, अशी बांगलादेश फलंदाजी करण्यापूर्वी परिस्थिती होती. अन् झालंही तसंच…. बांगलादेशने बिनबाद 8 धावा केल्या आणि पाकिस्तानला आपला गाशा गुंडाळून परतीचं तिकीट बूक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये.

पाकिस्तानच्या या हाराकिरीबरोबरच न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंडने हा प्रवेश केला आहे.

पाकिस्तानची परिस्थिती नेमकी मॅच चालू होण्यापूर्वी कशी होती??-

पाकिस्तानला केवळ विजय पुरेसा नव्हता. तर त्यांना बांगलादेशविरूद्ध 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागणार होत्या आणि त्यांना 84 धावांवर बाद करावं लागणार होतं.

दुसऱ्या समीकरणानुसार 350 धावा कराव्या लागणार होत्या आणि बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागणार होते.

तिसऱ्या समीकरणानुसार 450 धावा कराव्या लागणार होत्या आणि 129 धावांवर बांगलादेशला ऑलआऊट करावे लागणार होते. तर मग पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करू शकत होता.

अल्लाहाची इच्छा असेल तर आम्ही 500 धावाही करू शकतो, असं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने म्हटलं होतं.

बांगलादेशविरूद्ध पाकिस्तानची नेमकी कशी स्थिती राहिली??-

इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशला 315 धावांचं आव्हान दिलं. इमाम उल हकने 100 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या तर बाबर आझमने 98 चेंडूंत 96 धावा केल्या.

सामन्याअगोदर समालोचक आकाश चोप्राने उडवली होती पाकिस्तानची खिल्ली-

आकाश चोप्राने आज लॉर्डसच्या मैदानवर 500 ते 575 धावा होण्याची शक्यता आहे. परंतू वाईट बातमी ही आहे की या धावा दोन्ही संघाच्या मिळून होणार आहे…! अशा शब्दात आकाश चोप्राने पाकिस्तानची खिल्ली उडवली होती. दरम्यान, सोशल मिडीयात पाकिस्तानच्या या अवघड परिस्थितीवर तुफान विनोदांचा पाऊस पडतोय.

कोणते चार संघ आता सेमीफायनालमध्ये खेळताना दिसणार??-

1. ऑस्ट्रेलिया 2. भारत 3. इंग्लंड 4. न्यूझीलंड

IMPIMP