‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, जाणून घ्या अधिक

मुंबई | गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणं शक्य असतं.

सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात. मात्र या समभागांमध्ये गुंतवणूक करताना जोखीम अधिक असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं.

ऑक्टोबर 2020 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपच्या समभागाची किंमत फक्त 5.5 रुपये इतकी होती. सध्या ती 71 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फक्त 1 वर्षात 1,186 टक्के परतावा मिळाला आहे.

ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडचे यापूर्वीचे नाव लायकोस इंटरनेट लिमिटेड होते. ही कंपनी डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतं.

गेल्या सहा महिन्यांत Rattanindia Enterprises च्या शेअर्सनी गुंतवणूकादारांना नऊपट परतावा दिला आहे. या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना 800 टक्के फायदा करुन दिला आहे.

दरम्यान, गणेश हाऊसिंगच्या समभागाची किंमत ऑक्टोबर 2020 मध्ये 25 रूपये इतकी होती. आता त्याची किंमत 182 रूपये इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ

माणसांप्रमाणे चिंपांजीने धुतले कपडे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लग्नासाठी हिंदू धर्मांतर करतायेत, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा- मोहन भागवत

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका!

महाराष्ट्र बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच- देवेंद्र फडणवीस