कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंधांचे पालन होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

मुंबई |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रूग्णांसाठी बेड्स आणि इतर सुविधा कमी पडू लागल्याचं दिसू लागलं आहे. बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर खूप ताण येऊन ते सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होऊ शकत नाही. ही सगळी परिस्थीती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी निर्देशनास आणून दिली.

याच पार्श्वभूमीवर कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला काही निर्देश दिले आहे.

राज्यात घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने तातडीने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. रविवारी 28 मार्च रोजी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाढत्या कोरोनाचा आढावा घेत त्यावर चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अभ्यागतांना पूर्ण प्रेवशबंदी घालवी. खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.

सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये आणि समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सूचना प्रशासनास देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अर्थचक्रही प्रभावीत होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल असंही कुंटे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

महिलेचा भररस्त्यात धिंगाणा! म्हणतेय, ‘म.र्डर करून एका…

स्टंट करायला गेला पण चांगलाच अंगलट आला, चालू बाईकवर उभं…

एसबीआयची ग्राहकांना जबरदस्त भेट! आता अगदी कमी व्याजदरात…

ऐकावं ते नवलंच! दोन महिन्यांच्या चिमुरड्यासाठी गुजरातच्या…