देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला दुसरा झटका; मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. भाजपच्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाट आहे. राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरली.

शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पक्ष प्रमुखांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत वर्षा निवास्थानी दुपारी 12 वाजता तत्काळ बैठकीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आघाडी सरकारची एक वा दोन नाही तर तब्बल 21 मतं फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्याच आमदारांनी डच्चू दिल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा आघाडी सरकारमधील असंतोष दाखवून देत आहे. भाजपने म्हटल्याप्रमाणे पाच ही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. महाराष्ट्रासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… 

मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर 

सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार

अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण