मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली.
या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असं मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांचं लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती.
पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे.
60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रीकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.
त्याचप्रमाणं फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रीकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.
सध्या ओमिक्रॉनची चर्चा जोरात सुरु आहे. याबाबतचे अनुमानही वेगवेगळे आहे. ओमिक्रॉनवर देशातील वैज्ञानिकही बारकाईनं नजर ठेवून आहेत. याचा अभ्यास करत आहेत. आता जे अध्ययन देशातील संशोधकांनी केलं आहे, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“राज्यपालांचं उत्तर नाही आलं तरी अध्यक्षपदाची निवडणूक होणार”
“अजित पवार यांनी दरडावून नाही तर समजावून सांगावं”
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”