ऐकून व्हाल थक्क! ‘या’ चाॅकलेट बाॅक्सची किंमत आहे तब्बल 10 कोटी रुपये

चाॅकलेट म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय. चाॅकलेट म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त लहान मुलं नाही तर मोठ्यांना देखील चाॅकलेट खायला भरपूर प्रमाणात आवडतं. यातच आता व्हॅलेटाईनचा आठवडा चालू आहे म्हटल्यावर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात चाॅकलेटची मागणी असलेली पहायला मिळत आहे.

जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाॅकलेटसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. एवढंच नाही तर मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील व्यक्तींनादेखील आपण चाॅकलेट भेट म्हणून देऊ शकतो. त्यामुळे जगभरात चाॅकलेटचं मोठ्या प्रमाणावर सेवन केलं जातं. सगळ्या वयोगटातील लोक आवडीनं चाॅकलेटचं सेवन करताना दिसतात.

फेब्रुवारीचा महिना ‘प्रेमाचा महिना’ म्हणून ओळखला जातो. या ‘व्हॅलेंटाईन वीक’मधील प्रत्येक दिवस स्पेशल असतो. या आठवड्यात चॉकलेट मोठ्या प्रमाणात विकलं जातं. अगदी दहा रुपयांपासून करोडो रुपयांचं चॉकलेट बाजारात उपलब्ध आहे. अशाच एका महागड्या चाॅकलेटविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे.

choclate

या चाॅकलेटचा विशेष गोष्ट म्हणजे याला सोन्याची सजावट केली जाते. या विशेष प्रकारच्या सजावटीमुळे या चाॅकलेटची किंमत कोट्यावधींच्या घरात असते. त्याचबरोबर या बाॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची चाॅकलेटची सजावट केलेली असते. या चाॅकलेटची सजावट सोन्याच्या दागिन्यांनी केल्यामुळे या चाॅकलेट बाॅक्सची किंमत महाग असलेली पहायला मिळते.

या सजावटीमध्ये गळ्यातील हार, अंगठी अशे वेगवेगळे प्रकारचे दागिने असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हा चाॅकलेट बाॅक्स विक्रीसाठी नसून याची सर्वात महाग मिठाईमध्ये वरचं स्थान आहे.

choclate1

लेक फॉरेस्ट कॉन्फेक्शन्स ही कंपनी या बॉक्समधील चॉकलेट तयार करत असून यामध्ये सिमोन ज्वेलर्स सोन्याच्या सजावटीचे काम करतात. सोन्याच्या दागिन्यांची सजावट असल्यानं या चाॅकलेट बाॅक्सची किंमत 15 लाख डाॅलर आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्कम 10 कोटी रुपये आहे.

दरम्यान चाॅकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेेेगळ्या प्रकारचे फायदे होतात. चाॅकलेटमुळे ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी ठेवण्याचा आणि मेंदूमधील इंडाॅरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं.

यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. ‘डार्क चॉकोलेट’ खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेसाठीही चाॅकलेटचं सेवन गुणकारी असतं.

महत्वाच्या बातम्या – 

पित्ताचा त्रास होतोय? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा

बॉलीवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय दुसऱ्यांदा लग्न? बडा अभिनेता आहे तिचा होणारा नवरा

Toyato ने भारतात लाॅंच केली ही भन्नाट कार; जाणून घ्या किंमत

बापरे! मगरीची परत दहशत, शार्कलाच गिळंकृत केलं- पाहा व्हिडीओ

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा; फोटो व्हायरल