Omicron च्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | मुंबईतील ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या रुग्णांमुंळं त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता घेण्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा (Omicron) वेगानं संसर्ग होत आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांकडून काही निर्बंध लावण्यात येत आहेत. केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिलित आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.

15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. अलिकडेच समोर आलेल्या संशोधनातून काही नवी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टापेक्षाही अधिक वेगाने होतो आहे.

दक्षिण आफ्रिकेचे शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरात तब्बल 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे.

ओमिक्रॉनच्या फैलावासोबतच युरोप आणि अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हायरसने हाहा:कार माजवलाय. अमेरिकेत सलग पाचव्या दिवशी 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

लस न घेण्यासाठी रडून आकाश-पाताळ एक केलं, इंजेक्शन दिसताच महिला शेतात पळत सुटली, पाहा व्हिडीओ 

राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब 

जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल

10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख