यवतमाळमध्ये एकच खळबळ! तरूणीने रचला प्रियकाराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट, अन्…

यवतमाळ |  देशात सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.

तसेच सध्या सगळीकडे कोरोना या महाभयंकर विषाणूचे सावत पसरलेले आहे. यादरम्यान कमी खर्चात, कमी लोकांमध्ये अनेकांचे लग्नाचे बार उडाले आहेत. अशातच यवतामळमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहीती समोर येतं आहे.

लग्नाला केवळ चार दिवस उरलेले असताना, नवरीने चक्क आपल्या प्रियकराबरोबर भावी नवऱ्याला शित पेयतून घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथे घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेर तालुक्यातील कोहळा येथील किशोर परशुराम राठोड या तरुणाचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील एका तरुणीशी ठरला होता. त्यांचं लग्न 19 एप्रिल ला ठरलं होतं. मात्र तरूणीचे सोनखास येथील एका तरुणासोबत प्रेम संबंध होते.

परंतू घराच्यांच्या शब्दाबाहेर जाता येत नसल्याने, त्या तरूणीने लग्नास होकार दिला. त्यानंतर तिने आपल्या प्रियकरालासोबत घेऊन यातून एक मार्ग काढला आणि एक प्लॅन केला.

तरूणीने परशुरामला खरेदी कराण्याच्या कारणाने नेरमध्ये बोलावले.तरुणीही त्याठिकाणी दोन भाऊ आणि बहिणीसोबत दाखल झाली. त्यानंतर ती त्याला एका ज्यूस सेंटरमध्ये घेऊन गेली आणि ठरल्याप्रमाणे तिनी त्याला ज्यूस पिण्यास आग्रह केला. परशुरामने तो ज्यूल प्यायला, त्यानंतर ती तरूणी आपल्या बहिण, भावांसोबत निघून गेली.

काही वेळानंतर परशुरामला मळमळ होऊ लागली आणि तो खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने किशोर त्यातून पूर्णपणे बरा झाला आणि नंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची कबुली खुद्द भावी पत्नीनेच दिली. प्रियकर नववधू आणि तिच्या दोन भावासह बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत तरुणी आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

ह्रदयद्रावक! कोरोना झालेल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी…

तेरा साथ ना छोडेंगे! नवऱ्याच्या मृतदेहाला मिठी मारुन…

काळजाला हेलावून टाकणारी घटना! कोरोनामुळे एकुलत्या एक मुलाचा…

कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं…

आश्चर्यकारक! 25 वर्षीय ‘या’ महिलेने दिला चक्क नऊ…