मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेल (Westin Hotel) मध्ये राहणार आहेत. राज्यसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे पुढील तीन दिवस आमदार या हॉटेलमध्ये राहतील अशी माहिती समोर आली आहे.
हे हॉटेल सात मजल्यांचं आहे. यामध्ये 572 रुम उपलब्ध आहे. सोबत 13 मीटिंग रुम्स आहे. हॉटेलमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात अशा सर्व सुविधा मिळातात.
विविध प्रकारच्या रुमसाठी वेगवेगळे दर आहेत. हॉटेलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, येथील रुमचे दर फ्लेक्सिबल म्हणजेच बदलत असतात. त्यानुसार येथे एक दिवस राहण्यासाठी साधारण 8500-13000 रुपये इतका आहे.
सिंगल, फॅमिली, कपल, प्रीमियम रुम अशी सोय आहे. यानुसार रुमच्या किमतीही ठरवण्यात आल्या आहेत. जिभेचे चोचल पुरवणाऱ्यासाठी इंडियन फूड सोबत हॉटेलमध्ये स्वादिष्ट इटालियन आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आनंद घेता येऊ शकता.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार दिल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे.
शिवसेनेचे आमदार मुंबईत रिट्रीट हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. भाजपने आपल्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज सुरक्षितस्थळी हलवणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका
सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम