मुंबई | विधानपरिषद निवडणूक आज पार पडली असून भाजपच्या दोन मतांवरून काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं.
भाजपच्या दोन मतांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांचा निर्णय कळवला होता.
केंद्र निवडणूक आयोगाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. मतमोजणीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसने भाजपच्या आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणीला देखील उशीर झाला होता.
5 वाजता मतमोजणी सुरू होणार होती मात्र काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणीला तब्बल दोन तास उशीर झाला आहे. अखेर मतमोजणीला सुरूवात झाली असून निकाल लवकरच समोर येतील.
भाजप व महाविकास आघाडी दोघांकडूनही आमचेच सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीतही भाजप चमत्कार दाखवणार की महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचा वचपा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला
भाजपच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप, अशोक चव्हाण म्हणतात…
“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”
’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ