“देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”

नांदेड | सध्या राज्यात अनेक मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईत भोंग्यावरुन आणि हनुमान चालिसा पठनावरुन वातावरण तापेलेलं असताना आता आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगल्याचं दिसत आहे,

राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमध्ये पार पडला यावेळी त्यांनी केंद्र सरकारला धारेव धरलं.

लोकशाहीत राजकीय विरोध असायला पाहिजे पण राज्यात जे व्यक्तिगत राजकारण चालू आहे. ज्यात याला संपवा त्याला संपवा असे वातावरण झालंय, अशा हल्लाबेल अशोक चव्हाणांनी केला आहे.

महाराष्टात असं राजकारण चालणार नाही. लोक ठरवतील कुणास सत्तेत बसवायचे व कुणाला खाली बसवायचे. पण राज्यात लोकशाहीला मारक असे राजकारण सुरू आहे, असंही चव्हाण म्हणाले.

राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत विरोधक आणि सत्तेतील सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे. पण सध्या तर एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं.

राज्यात आणि देशात सुरु असलेल्या राजकारणामुळे सगळीकडे गोंधळ उडाला आहे. दिवसेंदिवस नवीन मुद्दा आणि कमालीचं राजकारण सुरुच आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona Update: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘या’ ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक

  ‘शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका, अन्यथा…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

  आत्ताची मोठी बातमी! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, तणावाचं वातावरण

काय सांगता! बंदुकीच्या धाकावर आमिर खानचं 70 लाखांचं घड्याळ लुटलं; CCTV फुटेज समोर

जाॅस द बाॅस! बटलरकडून दिल्लीच्या गोलंदाजांचे वस्त्रहरण, वादळी शतक झळकावलं