नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.
अर्थव्यवस्था गती घेत आहे, सर्वांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. कोरोना लसीकरण वाढवण्यावर सरकारचा भर दिला. जास्तीत जास्त रोजगार निर्मितीचेही प्रयत्न झाले, असंही त्यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम 9.2 टक्के देशाचा विकास दर असेल, असंही निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.
लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या की, देश सध्या कोरोनाच्या लाटेतून जात आहे, आमचे ध्येय सर्वांगीण कल्याण आहे. हा अर्थसंकल्प 25 वर्षांचा पाया घालणार आहे. खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Budget 2022 | अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केटने दाखवली ताकद
सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार?
‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य
मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक
राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता