Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगना आणि वा.द हे समीकरण काय नवीन नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर कंगनानं बॉलीवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या गोष्टींसह काही पक्षांवरही उघडपणे टी.का केली आहे. कंगना काहीतरी बोलली आणि वा.द झाला नाही, असं क्वचितच घडत असेल.

बॉलीवूड मधील नेपोटीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कंगना राणावतनं केलेल्या एका ट्वीटमुळे तिला आणि तिची बहिण रंगोली हिला अटक होऊ शकते.

कंगना रानावातनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता.

मुन्ना वराली आणि साहील अशरफ सय्यद यांनी प्रथम कंगनानं केलेल्या वक्तव्यामुळे पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं त्यांनी न्यायालयात कंगना विरुद्ध याचिका दाखल केली होती. न्यायालयानं आता याप्रकरणी पोलिसांना कंगना विरुद्ध गु.न्हा दाखल करत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगनासाठी हा फार मोठा झटका मानला जात आहे. वराली आणि सय्यद यांनी दाखले केलेली याचिका पाहता कंगना विरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गु.न्हा दाखल करण्यात यावा, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.

कंगना राणावत वारंवार बॉलीवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया ते प्रसारमाध्यमे प्रत्येकच ठिकाणी ती बॉलीवूड विरोधात बरळत आहे. ती प्रत्येकचवेळी बॉलीवूड मधील घराणेशाहीबद्दल बोलत आहे, असंही वराली आणि सय्यद यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, कंगना राणावत आता न्यायालयाच्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतेय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच कंगना राणावत ग.जाआड जाणार का?, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!

पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…

मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवरून महाराष्ट्र सरकारमध्ये चुरस; ‘ही’ नावं चर्चेत