इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

अहमदनगर | कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनातील पुत्रप्राप्तीच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर मध्यंतरी खटला दाखल करण्यात आला होता. संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात हा खटला चालू होता. इंदोरीकर महाराजांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर संगमनेर सत्र न्यालायने आता महत्वाची भूमिका बजावत खटल्याला स्थगिती दिली आहे.

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन लोकांना गर्भलिंग चिकित्सा किंवा तत्सम माहिती देण्यासाठी आयोजित केलेलं नव्हतं. तर ते एक अध्यात्मिक प्रभोधनासाठी होतं. त्यामुळे कथित विधान त्यामध्ये झालं असलं तरी जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, असं निरीक्षण संगमनेरच्या सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे.

संगमनेरच्या सत्र न्यायालयानं इंदोरीकर महाराजांविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात चालू असणाऱ्या खटल्याला स्थगिती दिली आहे. संगमनेर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निरीक्षण नोंदवत हा आदेश दिला आहे.

दरम्यान, बालाजी तांबे यांच्याविरुद्ध असाच एक खटला चालू होता. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यावेळी तांबे यांना दिलासा देणारा निर्णय दिला होता. त्या निर्णयाचा आदेशही इंदोरीकर महाराजांच्या वतीने युक्तिवाद लढणारे अॅड. के.डी. धुमाळ यांनी न्यायालयात सादर केला.

महत्वाच्या बातम्या-

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह

बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!

सुशांतच्या माझ्याजवळ संपत्ती म्हणून फक्त ‘या’ दोनच गोष्टी आहेत; अखेर रियाने केला खुलासा!