“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल फार्मसीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेला निखिलच्या विरोधात 13 मे रोजी पहिला एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर अनेकांच्या तक्रारींवरून त्याच्याविरोधात आणखी पाच पोलिस ठाण्यांत एफआयआर दाखल झाले. आता प्रकरणावरून कोर्टानं पोलिसांना फटकारलं आहे.

ज्या एका ट्वीटच्या आधारावर तब्बल सहा एफआयआर दाखल झाले ते झा यांनी निदर्शनास आणल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या ट्वीटमध्ये तर कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेखच नाही. तरीही तरुण विद्यार्थी एक महिन्यापासून गजाआड आहे. तुम्ही अशाप्रकारे कारवाई करायला लागलात, तर नाहक देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच प्रतिष्ठा कमी होईल, असं कोर्टानं म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनाही कदाचित पोलिसांकडून काय सुरू आहे याची कल्पना नसावी. दररोज हजारो ट्वीट होत असतात. अनावश्यक बदनामी करणाऱ्यांबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणं बरोबर आहे. पण अशाप्रकारे नव्हे. या ट्वीटमध्ये व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेखही नाही, असं खंडपीठाने  म्हटलंय.

वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची…, असं ट्विट निखिल भामरेने केले होतं. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले 

निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत! 

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर 

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर 

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील”