Top news महाराष्ट्र मुंबई

न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय

nitesh rane 2 e1640704997534
Photo Credit- Facebook / Nitesh Rane

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल.

नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे.

या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता.

या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली आहे आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाहीये.

दरम्यान, नितेश राणेचे वकील मुकुल रोहोतगी यांनी म्हटलं, हा राजकीय कट आहे. आम्हाला वेळ दिला गेला नाही. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पूर्णपणे शिजवलेले प्रकरण आहे. ते विद्यमान आमदार आहे. तक्रारदार ही विरुद्ध पक्षाची व्यक्ती आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं

 “…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”

‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य 

‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट

‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ