तुझ्या शरीराचं ते अंग दाखव; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे झाली होती मागणी

मुंबई | चित्रपट सृष्टीमध्ये कास्टिंग काऊच आणि लैगिक शोषणाचे आरोप नेहमीच होत असतात. चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी मध्यंतरी ‘हॅशटॅग मी टू’च्या माध्यमातून अनेक दिग्गजांवर लैगिक शोषणाचे आरोप लावले होते. दरम्यान, सुरवीन चावला या अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

मी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. एका दक्षिणात्य दिग्दर्शकानं माझ्या शरीराचा एक एक अंग पाहण्याची मागणी केली होती, असं सुरविननं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

हा सर्व प्रकार आठवला की आजही दचकते, असंही तिने म्हटलं आहे. सुरवीन सोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबतही चित्रपटसृष्टीत गैरवर्तन होत असते, याबद्दलही सुरविननं संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, काही वर्षांपासून सुरविन सिनेसृष्टीपासून लांबच आहे. सुरवीन चावलाने अक्षय ठक्करसोबत लग्न केलं असून या जोडप्याला ईवा नावाची मुलगी आहे. सुरवीन आणि अक्षयचा सध्या इटलीत संसार थाटला आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह

बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!