‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | देशातील गाण्याचं सर्वात मोठं स्टेज समजल्या जाणाऱ्या ‘इंडियन आयडॉल’च्या बाराव्या पर्वाचा काही दिवसांपूर्वीच अंत झाला आहे. हे पर्व नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. इंडियन आयडॉलचे हे पर्व संपले तरी देखील प्रेक्षकांच्या मनात अद्याप या शोची जादू आहे.

या पर्वातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांवर जणू जादूच केली होती. इंडियन आयडॉलच्या बाराव्या पर्वाचा विजेता पवनदीप राजन आणि अरुणीता कांजीलाल हे या पर्वातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार ठरले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

तसेच या दोघांच्या नात्याबद्दल देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, दोघांनीही या गोष्टीला नकार देत आपण फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं.

अशातच आता पवनदीप आणि अरुणिताची ही जोडी ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या नव्या भागात पाहायला मिळणार आहे. यावेळी इंडियन आयडॉल 12 चे सर्व फायनलिस्ट देखील असणार आहेत. तसेच दिपिका पादुकोण आणि फराह खान देखील असणार आहेत.

पवनदीप आणि अरुणिताने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत याविषयी माहिती दिली आहे. नुकतंच या दोघांनी एकत्र लाईव्ह सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत आपण केबीसीमध्ये येणार असल्याची माहिती दिली.

काही दिवसांमध्ये गणपती बापाचं आगमन होणार आहे. गणपती सोहळ्यानिमित्त या सर्व कलाकारांना केबीसीमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. यामुळे आता हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

https://www.instagram.com/tv/CThWIYpqXgK/?utm_source=ig_embed&ig_rid=8fb59b4a-e243-4c0c-852c-364f25218e6f

महत्वाच्या बातम्या-

…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ

परफेक्ट सीनसाठी ‘या’ अभिनेत्रीने सर्वांसमोर न्यूड होऊन अभिनय केला होता

काय सांगता! भारतीने घटवलं तब्बल 15 किलो वजन, बदल पाहून चाहते आवाक्

संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?

पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…