मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती

मुंबई | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी दिली होती. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयांना आता नवनिर्वाचित शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात येत आहे.

औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर तर नवी मुबंई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत संमत केला होता.

ठाकरे सरकारने घेतलेल्या या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. नामांतराबाबत आता शिंदे सरकार नव्याने निर्णय घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यापालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र देऊनही ठाकरे सरकारने हे लोकप्रिय निर्णय घेतले. त्यामुळे ठाकरे सरकारनं अखेरच्या क्षणी घेतलेले हे निर्णय नियमबाह्य असल्याने याला स्थगित दिल्याचं सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत सूतोवाच करून या निर्णयावर आक्षेप घेतला होता. ठाकरे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली असून याबाबत नव्याने निर्णय होऊ शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तापालट होण्याआधी ठाकरे सरकारने 29 जून रोजी शेवटची कॅबिनेट बैठक घेत 3 महत्त्वपूर्ण नामांतराचे प्रस्ताव मंजूर केले होते. ठाकरे सरकारच्या या निर्णयाची राज्यात मोठी चर्चा देखील झाली होती. मात्र, हे निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारने आता स्थगित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, ‘या’ मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होणार?

राज्यात पावसाचा जोर ओसरणार मात्र दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या केसरकरांना अजित पवारांचा प्रेमाचा सल्ला, म्हणाले…

अभिनेत्री सुष्मिता सेनने ललित मोदीसोबत संसार थाटला?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“165 आमदारांचं पाठबळ तरी, दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत”