Top news मनोरंजन

दिग्दर्शकाने ‘या’ बड्या अभिनेत्रीकडे केली होती अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी; पाहा सलमानने कसं वाचवलं

Photo Credit- Facebook/ @BeingSalmanKhan,@priyankachopra

लखलखत्या दुनियेच्या मागचा चेहरा आता लोकांपासून लपून राहिलेला नाही. ‘me too’ चळवळीचा आधार घेत बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या अ.न्यायाला वाचा फोडली. 9 फेब्रुवारी रोजी पिगी चॉप्सच्या ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात प्रियंकाने तिच्या चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच त्या पुस्तकामध्ये प्रियंका चोप्रासोबत घडलेला एक ध.क्कादायक प्रकार समोर आला आहे.

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाने अंतर्वस्त्र दाखवण्याची मागणी केली होती. एका हिंदी चित्रपटाच्या शुटींग वेळी एका दिग्दर्शकाने तिच्याकडे अशाप्रकारची मागणी केली असल्याचं तिने त्या पुस्तकात सांगितलं आहे. मात्र प्रियंकाने दिग्दर्शकाचे नाव आणि त्या चित्रपटाचे नाव सांगितले नाही.

चित्रपटातील आयटम सॉंगसाठी प्रियंकाला अंगावरील कपडे उतरवायला सांगितले होते. याला पर्याय म्हणून प्रियंकाने अंगावर अतिरिक्त कपडे म्हणजेच बॉडी सूट घालण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. जेणेकरुन गाण्यामध्ये संपूर्ण कपडेही काढल्याचे दिसेल आणि कॅमेऱ्यासमोर लाजही राखली जाईल.

बॉडी झाकण्यासाठी बॉडी लेअरचा वापर केला तरी गाण्यात तुझी अंतर्वस्त्र दिसायलाच हवी. नाहीतर प्रेक्षक चित्रपट पहायला येणार नाहीत आणि त्यांना सिनेमा देखील आवडणार नाही, असं दिग्दर्शक म्हणाले असल्याचं प्रियंकाने पुस्तकात लिहिलं आहे.

हेे सगळं ऐकल्यानंतर प्रियंकाला खूप मोठा ध.क्का बसला. तिने दिग्दर्शकाला समजवण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाने शुटींग सोडून जाण्याचीही ध.मकी दिली. परंतू त्यांनी तिचे ऐकले नाही. शेवटी प्रियंकानेच तो चित्रपट करण्यास नकार दिला. प्रियंकाचा हा निर्णय दिग्दर्शकाला महागात पडला आणि चित्रपटाचे खूप नुकसान झाले.

काही दिवसांनंतर प्रियंका दुसऱ्या चित्रपटाचे शुटींगमध्ये व्यस्त असताना नुकसान झालेल्या चित्रपटाचे निर्माते प्रियंकाकडे आले. त्यांनी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची बाजू मांडत प्रियंकाशी वाद घालायला सुरुवात केली.

प्रियंका ज्या चित्रपटाचं शुटीग करत होती. त्या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खानही काम करत होता. त्यावेळी सलमान खानने सुुरु असलेल्या वादात मध्यस्ती करत त्या निर्मात्याला प्रियंकाची बाजू समजावून सांगितली. त्यानंतर काही वेळातच तो वाद मिटला.

महत्वाच्या बातम्या-

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या

नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….