दोनवेळा विवाह करून देखील ‘हा’ बडा दिग्दर्शक 21 वर्षाच्या मुलीला डेट करतोय!

मुंबई | बॉलीवुड मधली प्रेम प्रकरणं ही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. बॉलीवुडमध्ये कित्येक प्रेम प्रकरणे रोजच समोर येतात. कोणी कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी लग्न करतं आणि हे फक्त बॉलीवुडमध्येच होतं. आता अशाच काहीशा प्रेम प्रकरणासाठी अनुराग कश्यप चर्चेत आला आहे.

अनुराग हा बॉलीवुड मधील एक नावाजलेला दिग्दर्शक आहे. 10 सप्टेंबर 1972 साली जन्मलेला अनुराग आतापर्यंत 2 वेळेस विवाह बंधनात अडकला होता. परंतु त्याचे हे दोन्हीही विवाह जास्त काळ टिकू शकले नाहीत.  अनुराग कश्यप याने 2003 मध्ये आरती बजाज हिच्याशी लग्न केलं होतं. पण या दोघांचं वैवाहिक आयुष्य जास्त काळ टिकू शकलं नाही आणि हे दोघे 2009 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले.

यानंतर कश्यप याने 2011 मध्ये कल्की कोचर हिचाय्शी विवाह केला. मात्र, अनुरागचं कल्कीसोबत देखील वैवाहिक आयुष्य जास्त दिवस राहिलं नाही. कल्की आणि अनुराग या दोघांनी 2015मध्ये घटस्फोट घेतला.

पुढे अनुराग त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 21 वर्षीय शुभ्रा हिला डेट करू लागला. जेव्हा अनुराग आणि शुभ्रा एकत्र डेट करते होते तेव्हा ती अवघ्या 21 वर्षांची होती.

या घटनेला किमान 5 वर्ष झाली असतील. सध्या ती 25 वर्षांची आहे. परंतु आत्तापर्यंत या दोघांनी त्यांचे हे नातं अधिकृतपणे मान्य केलेले नाही. सध्या सोशल मीडियावर अनुराग आणि शुभ्राचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अनुराग सध्या शुभ्राशी नात्यांमध्ये आहे. परंतु या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.

अनुराग प्रेमाबद्दल असे सांगतो की, प्रेमात पडल्यानंतर माणसाला अनेक गाणी आवडू लागतात. मात्र, जेव्हा ते नात तुडतं तेव्हा तुटलेले मन हे अधिक धोकादायक असंत.

अनुराग सांगतो तुटलेल्या मनासह जगण्यापेक्षा तुम्ही प्रेमात पडा. प्रेमात पडण्याचा अधिकार सर्वांना आहे. प्रेमाला वयाची कोणतीच मर्यादा नसते.

90 वर्षांचा व्यक्ती देखील प्रेमात पडू शकतो. प्रेम हे प्रेमच असतं. प्रेम हे अनेक प्रकारे समोर येतं. काही लोकांना त्याचा त्रास होतो तर कही लोक ते खूप मनसोक्त जगतात, असं अनुराग प्रेमाबद्दल बोलताना म्हणतो.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णव गोस्वामींच्या जामीन अर्जावर हायकोर्टाची मोठी सुनावणी! जामीन अर्ज फेटाळत दिला महत्वाचा आदेश

“गोस्वामींच्या जिवाला धोका आहे, मी त्यांना भेटायला चाललोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा” – राम कदम

मॅचपूर्वी रहाणेला जडेजासोबत पाहून शिखर धवनची सटकली अन् मग…

राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे राज्यपालांकडे सोपविताच राऊतांचा राज्यपालांसह भाजपवर निशाणा म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा मोठा झटका! पत्नी मेलानिया लवकरच घेणार घटस्फो.ट?