ड्रेसिंग रुमध्ये झालेली चर्चा आली समोर; रवी शास्त्रींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मंगळवारी भारतीय संघाने हा विजय खे.चून आणला आहे.

भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाला या सामन्यात मिळालेला विजय पाहून अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. अशातच आता भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांचा या विजयानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

या मालिकेत मिळवलेल्या विजयानंतर रवी शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे कौतुक करत आहेत. तसेच ते खेळाडूंना शुभेच्छा देखील देत आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री म्हणत आहेत की, संघाला मिळालेल्या या विजयानंतर माझ्या डोळ्यात अ.श्रू आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून जो संघ.र्ष दाखवला तो खरंच अवि.श्वसनीय आहे. तुम्ही एकदासुद्धा हा.र मानली नाहीत. तुम्हाला झालेल्या दु.खापती असोत किंवा 36वर बा.द होणे असो. क.ठीण परिस्थितीत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवणे गरजेचे असते.

या सर्व गोष्टी काही एका रात्रीत घडत नाहीत. याच्या पाठीमागे बऱ्याच वर्षांची मे.हनत असते. या विजयातून तुम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच तुम्ही एक संघ म्हणून उत्तम कामगिरी करता.

तसेच रवी शास्त्री पुढे म्हणाले की, शुभमनची खेळी शानदार होती. रिषभने अवि.श्वसनीय फलंदाजी केली. रिषभ फलंदाजी करताना इतरांना हार्टअ.टॅक आणू शकतो. या सामन्यात त्याची खेळी अप्रतिम होती. पुजारा एक अ.ल्टिमे.ट वॉ.रियर आहे.

अजिंक्य तू कर्णधा.र म्हणून ज्या परिस्थितीतून संघाला सावरले ते खरंच कौतुकास्पद आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन व शार्दुल ठाकुरला देखील विसरून चालणार नाही. त्यांनी देखील या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे.

आज भारताबरोबरच संपूर्ण जग तुम्हाला स.लाम ठोकत आहे. या विजयाचा आनंद घ्या. जितकी मजा लु.टता येईल तितकी लु.टण्याचा प्रयत्न करा, असं देखील रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-