‘तो’ एक निर्णय, वाद आणि अनेक वर्ष अबोला; ‘या’ कारणामुळे लतादीदी-आशाताईंमध्ये आलेला दुरावा

मुंबई | लता मंगेशकर एक असं व्यक्तीमत्व ज्यांना सरस्वती देवीचा दर्जा देण्यात आला होता. 92 व्या वर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास तिरंग्यातून झाला.

लतादीदी यांनी एक काळ गाजवला, त्या खऱ्या अर्थानं सम्राज्ञी ठरल्या. असं असतानाच एक टप्पा असा आला, की त्यांचं आणि बहीण, गायिका आशा भोसले यांचं नातं तणावाच्या वळणावर आलं होतं. अतिशय कमी वयातच लता दीदींवर कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या आधारस्थानी आल्या. यातच त्यांची भावंड मोठी होत होती. आशाताई जेव्हा मोठ्या झाल्या तेव्हा दीदींच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. पण, आशाताईंचा स्वभाव वेगळा.

बंधनांचे पाश, साचेबद्ध गोष्टींपासून त्या दूरच असायच्या. त्यांनी आपल्या वेगळ्या वाटा निवडण्यास सुरुवात केली.16 व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. असं म्हटलं जातं की, गणपतराव हे लता दीदींचे सेक्रेटरी होते. त्यांचं वय त्यावेळी 31 वर्षे आणि आशा भोसले यांचं अवघं 16 वर्षे.

आशाताईंचा हाच निर्णय दीदींना खटकला. दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला. आशाताईंनी कुटुंबाशीही दुरावा पत्करला आणि त्यांनी वेगळं आयुष्य सुरु केलं. दीदींना आपल्या बहिणीचं गणपतरावांशी असणारं नातं कधीच पटलं नाही. मोठी बहिण म्हणून आपल्या बहिणीच्या ते योग्य नाहीत असं त्यांना वाटत होतं. मनातली ही भीती खरी ठरली. आशा भोसले आणि गणपतराव यांना तीन मुलं झाली. पण, पुढे त्यांच्याच इतके मतभेद झाले की हे नातं अतिशय वाईट वळणावर येऊन संपलं.

एका मुलाखतीमध्ये बोलताना लता मंगेशकर यांनी यावर भाष्यही केलं होतं. आशानं आम्हाला कोणाला न सांगता लग्न केलं. ती तेव्हा लहान होती. याचा धक्का आमच्या आईला म्हणजेच माईला बसला होता. आम्ही आशाला काही बोललो नाही. पण गणपतराव भोसलेंनी आशाला आमच्याशी बोलायचं नाही असं सांगितलं होतं. तिला आम्हाला भेटायचीही मनाई केली होती. ही परिस्थिती काही वर्षं होती, असं त्यांनी सांगितलेलं.

दरम्यान, लता मंगेशकर जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव बनल्या होत्या, त्याचवेळी आशा भोसलेही स्वतःची शैली विकसित करत होत्या. एकाच क्षेत्रात असलेल्या दोन सख्ख्या बहिणी, त्यामुळे तुलनाही होत होती. लता दिदी आणि आशा भोसलेंमध्ये स्पर्धा आहे, अशीही चर्चा व्हायची. तेव्हापासून ते आतापर्यंत हा लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय होता.

लोकांमध्ये चर्चा असली तरी लता दीदींची गाण्याची शैली माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. आम्ही इतरही अनेक गोष्टींमध्ये एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या आहोत. आम्ही एकमेकींच्या जवळ आहोत, पण आमच्यात कधीही स्पर्धा नव्हती. आमचं एकमेकींवर प्रेम आहे आणि मला त्यांच्यासोबत गायला नेहमी आवडतं, असं आशा भोसले यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लग्न झालेलं नसतानाही लतादीदी लावत होत्या सिंदूर; सांगितलं होतं ‘हे’ खरं कारण! 

लतादीदींच्या पार्थिवावर शाहरुखनं फुंकर मारली, जाणून घ्या याचा अर्थ! 

हॉस्पिटलमध्ये लतादीदींनी मागवलेले इअरफोन; शेवटच्या क्षणांमध्ये ‘या’ व्यक्तीची गाणी ऐकली 

‘दादागिरी खपवून घेणार नाही’, रक्षा खडसेंचा इशारा 

बापलेकीचं नातं.. सुप्रिया सुळेंनी स्वत:च्या हातांनी शरद पवारांना बूट घातले, व्हिडीओ व्हायरल