Top news

चक्क कुत्राही करतोय विकेंडची तयारी, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@Switty2020

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ विनोदी, तर कधी-कधी अतिशय सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच काही व्हिडीओ प्राण्यांचेही व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचवेळा हाणामारी करतानाचे व्हिडीओ असतात. परंतू सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, आपल्याला दिवसातील कमीत-कमी सात तास तरी झोप घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काहींना तर इकती झोप प्रिय असते की, त्यांना कोणत्याही ठिकाणी ते लोक झोपू शकतात. असे लोक झोपण्याआधी सगळी तयारी करून ठेवत असतात.

मात्र तुम्ही कधी एका प्राण्याला झोपण्याआधी तयारी करताना पाहिलं आहे का, नसेल तर सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा आपल्या झोपण्याची पूर्व तयारी करताना दिसत आहे. सुरूवातीला तो एका बेडवर बेडशीत अंथरतो. त्यानंतर तो त्या बेडजवळ असलेल्या टेबलावरील फॅनचे बटन दाबून फॅन चालू करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यानंतर तो लाईट बंद करण्यासाठी कुत्रा बेडवरून खाली उतरतो. परंतू लाईटचा स्विच वरती असल्यामुळे तो एक युक्ती लढवतो आणि शेजारी असलेल्या टेबलावर चढून लाईटचा स्विच ऑफ करतो.

तसेच हा व्हिडीओ ‘स्विटी’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘ट्रू विकेंड’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत तीन हजार लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा…

‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’,…

‘देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी…

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग…

माजंरीच्या पिल्लांना वाचवण्यासाठी चिमुलीची धडपड पाहून…