जन्मदात्याचं ‘ते’ वाक्य जिव्हारी लागल्याने आठवीत शिकणाऱ्या मुलीने संपवलं आपलं आयुष्य!

रत्नागिरी | सध्या कोरोना विषाणूमुळे देशातील शाळांना कुलूप लावण्यात आलं आहे. शाळा-कॉलेजेसचा उपयोग हा क्वारंटाईन सेंटरसाठी करण्यात आला आहे. शाळा तर बंद मग आता विद्यार्थ्यांचं शालेय वर्ष तर वाया जावून द्यायचं नाही. त्यासाठी राज्य सरकराने शाळांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सांगितला आहे.

इतरवेळी मुलांना पालक मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण आता ऑनलाईन शिक्षणात मोबाईल लागतो. मात्र रत्नागिरीत ऑनलाईन शिक्षणामुळे फोन वापरण्याबाबत पालकांचं एक वाक्य मुलीच्या जिव्हारी लागलं आणि तिने आपलं जीवन संपवलं.

शहरातील सोमेश्वर मुस्लीम मोहल्ला येथील मारिया आजिम दाऊद ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. ऑनलाईन शिक्षणामुळे तिचीही ऑनलाईन शाळा चालू होती. मात्र एक दिवस मारिया रात्री मोबाईल खेळताना तिच्या वडिलांना सापडली. त्यावेळी तिला तिचे वडिल चांगलेच रागावले, आणि म्हणाले यापुढे मोबाईलवर गेम खेळू नको, मोबाईल हा फक्त ऑनलाईन क्लासोससाठी वापरायचा, अशी ताकिदच मारियाच्या वडिलांनी तिला दिली. कितीही काही केलं तरी जास्त मोठी नाही पण लहानच पोर ती, अवघ्या 15 वर्षाची. वडिलांनी आपल्याला राागावलं याचा राग तिने मनात धरला आणि ओढणीच्या सहाय्यानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, सकाळी उठल्यावर मारिया झोपलेल्या ठिकाणी नव्हती. तेव्हा घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि एका खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. हा सर्व प्रकार पाहून घरच्यांना तर धक्काच बसला आहे.  मोबाईलसारख्या कारणावरून मारियाने इतका मोठा निर्णय तिने घेतला.

महत्वाच्या बातम्या-

….म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचार करत आहे- चंद्रकांत पाटील

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

रक्षाबंधन दोन दिवसांवर असताना कोरोनाने महापौर किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचा केला घात!!

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”