मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला

मुंबई | भाजप आमदार मुक्ता टिळक व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या दोन मतांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसला मोठा धक्का देत राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला आहे. मतमोजणीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.

मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांच्यासोबत मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते व त्यांनी मतदानपेटीत मत टाकल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला होता. भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला असून आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे. त्यामुळे मतमोजणीला लवकर सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मतमोजणी 5 वाजता सुरू होणार होती. मात्र, काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला उशीर झाला आहे.

दरम्यान, काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर आम्ही आधीच परवानगी घेतल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसचा आक्षेप म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप, अशोक चव्हाण म्हणतात…

“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”

’56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

“आज कुणीही पावसात भिजलं तरी काहीही उपयोग नाही, मविआ निवडणूक हरणारच”

“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…”