Top news देश

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आयोगाचा झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

sushil chandra election comission e1641638303210

नवी दिल्ली | देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या बहुप्रतिक्षीत पाच राज्यांच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. परिणामी आता सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

देशातील पाच राज्यांतील 690 विधानसभेच्या जागांसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. एकूण सात टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.

पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, या राज्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

मोठ्या प्रमाणात राजकारणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. हे पहाता आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गुन्हेगारी पाश्वभूमीच्यांना उमेदवारी देण्यात आल्यावर पक्षाला त्याबाबत आयोगाला लागलीच कळवावं लागणार आहे. त्या उमेदवाराला उमेदवारी देण्यामागच कारण आयोगासमोर पक्षाला स्पष्ट करावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात बाहूबलींचं प्रमाण असतं परिणामी आयोगाकडून हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आयोगाच्या या निर्णयानं राजकारणातील गुन्हेगारी संपण्याकडं एक महत्त्वाचं पाऊल पडलं आहे.

देशातील केंद्रीय सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्या राज्याच्या निवडणुकीकडं सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या सत्तेत असणारा भाजपसमोर आता सत्ता राखण्याचं आव्हान आहे.

पाच राज्यातील सात टप्प्यांच्या मतदानानंतर एकाच दिवशी म्हणजेच 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. सध्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

दरम्यान, राज्यातील या निवडणुकीसाठी आयोगानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सध्या सर्व प्ररकारच्या रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे