नवी दिल्ली | सोशल मीडियावर आपण अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहत असतो. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात, तर काही व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल असे असतात.
आपल्याला माहित आहे की माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माणूस स्वत: खूप मोठा समजू लागला आहे. माणसाने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. एवढंच नाहीतर तो चंद्रावरही जाऊन आला आहे. आताच्या वेळेला प्रत्येकजण स्वत:चंच खरं करत असतो. दुसऱ्यांच ऐकून घ्यायला त्याला कमीपणा वाटतो.
माणसाने निसर्गालाही सोडलं नाही. आपल्या मौज-मजेसाठी त्यानं निसर्गाची हानी केली. बिल्डिंग उभ्या करण्यासाठी पुढचा मागटा विचार न करता खूप मोठं-मोठी झाडं तोडली. या सगळ्याचा परिणाम आपल्या भोगावा लागणार आहे. काही प्रमाणात या कोविड-19 च्या काळात आपण तो भोगलाही आहे.
या काळात अनेकजणांच्या डोक्यात प्रकाश पडून अनेकांनी निसर्गाची काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. काहींना स्वच्छता मोहिम राबवली, तर काहींनी ठिक-ठिकाणी लहान रोपटी लावली. परंतू काय तुम्ही याआधी एका कुत्र्याला वृक्षारोपन करताना पाहिलं आहे का?.
नसेल पाहिलं सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक कुत्रा वृक्षारोपन करताना पाहायला मिळतं आहे.
सुरूवातीला एक मुलगी आपल्या गार्डनमध्ये रोपटं लावण्यासाठी हाताने खड्डा करत आहे. तिचं पाहून कुत्राही आपल्या पायानं एक खड्डा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ती मुलगी त्या खड्यामध्ये एक झाडाची बी रोवते, तिचं पाहून कुत्राही त्यानं केलेल्या खड्यामध्ये एक बी टाकतो.
हे करून झाल्यावर ती पाणी घालण्यासाठी पाण्याची नळी कुत्र्याकडे देते. कुत्रा ती नळी घेऊन लावलेल्या झाडाच्या बी शेजारी येतो. दिलेली नळी आपल्या तोंडात धरून त्याला हळूवारपणे पाणी घालताना व्हिडीओमध्ये दिसून येतं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतानाही दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ
आईस्क्रिम खाता-खाता बायकोने असं काही केलं की नवऱ्याचे डोळेच फिरले, पाहा व्हिडीओ
प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ
दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल