मुंबई | मद्यप्रमेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात आयात करण्यात येणारे परदेशी दारूच्या दरामध्ये (scotch whisky ) तब्बल 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने (maharashtra government) घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते.
अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे. राज्यात आयात करणाऱ्या दारूवर (scotch whisky ) उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने 18 नोव्हेंबर रोजी घेतला होता. राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहेत. जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की ही आधी 5760 रुपयांना मिळत होती. आता नवीन दरानुसार 3750 रुपयांना मिळणार आहे.
जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की (Johnny Walker Red Label Blended Scotch Whiskey) ही जुन्या दरानुसार 3060 रुपयांना मिळत होती. आता नवीन दरानुसार 1950 रुपयांना मिळणार आहे.
जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्कीचे (j&b rare blended scotch whiskey) आधीचे दर हे 3060 रुपये होते आता 2100रुपयांना ही दारू मिळणार आहे.
ब्लॅन्टाइन्स (ballantine whisky) फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्कीही आधी 3075रुपयांना मिळत होती ती आता नवीन दरानुसार 2100 रुपयांना मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”
“शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं”
“मोठा भाऊ म्हणून आम्ही आदर करू, पण हे खपवून घेतलं जाणार नाही”
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य