गायी तयार करण्यासाठी कारखाना सुरू करणार- गिरिराज सिंह

नागपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केल आहे. गायी तयार कण्यासाठी कारखाना सुरू करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने गायीच्या पोटी वासरेच जन्माला येतील. नागपूरमध्ये मदर डेअरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावर्षी 30 लाख गायी निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. ‘सरोगेट मदर’च्या एम्बियो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून ज्या गायी दूध देत नाहीत, त्या गायींची 20 लीटर दूध देण्याची क्षमता निर्माण करणार आहोत. यामुळे देशभरात सर्वात स्वस्त दूध भारतात मिळेल, असा दावा गिरीराज सिंह यांनी केला. 

गायी तयार करण्यासाठी कारखाना सुरू केल्यावर देशातील वाढत्या माॅब लिचिंगसारख्या घटना कमी होतील, असा अजब दावाही त्यांनी केला. विदर्भातील गायी लहान असून त्या 1 ते 2 लीटर दूध देतात, असंही सिंह म्हणाले आहेत.

येत्या काळात देशामध्ये कोणत्याही गायीची गर्भधारणा होईल त्या गाईला केवळ वासरूच होईल, सर्टिंग सेक्स सीमद्वारे शक्य आहे. यामध्ये बेवारस जनावारांचा उपयोग होईल आणि युवा शेतकरी पीढीला याचा फायदा होईल, असेही गिरीराज सिंह यावेळी बोलले. 

 

महत्वाच्या बातम्या-