सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत भाव

नवी दिल्ली  | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणं हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देताना दिसतात.

आज सोन्याच्या दरात केवळ 10 रुपयांनी घसरण झालेली पहायला मिळतं आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा दर प्रति तोळा 45 हजार 920 रुपये इतका झाला आहे. काल सोन्याच्या दरातही 10 रुपयांनी घसरण झाली असून, काल सोन्याचा दर प्रति तोळा 45 हजार 930 रुपये इतका होता. म्हणजेच आजच्या दराच्या फक्त दहा रुपये जास्त होता.

चांदीच्या दरात आज 700 रुपयांनी वाढ झालेली दिसतं आहे. त्यामुळे चांदीचा आजचा दर प्रती किलो 68 हजार 200 रुपये इतका आहे. काल चांदीच्या दरात कोणत्याच प्रकारची चढ-उतार पाहायला मिळाला नाही. त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर प्रती किलो 67 हजार 500 रुपये इतका होता.

मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दर वाढत होते. सोने 47 हजारांच्या पुढे होते. मात्र, मागील 15 दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याचे दर 45 हजाराच्या पुढे गेले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.
महत्वाच्या बातम्या-

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय – तृप्ती देसाई

मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

‘कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर’, सोहेल खानचा राखी सावंतला मदतीचा हात