मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

धुळे | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आपलेच लोक आपल्यांवर अंत्यसंकार करण्यासाठी घाबरत आहेत. अनेक कोरोनाबाधितांचे मृतदेह बेवारसपणे सोडून दिल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, या काळातही काही लोक माणुसकीची जाणीव करून देत कोरोनाबाधितांसाठी काम करत आहेत. धुळ्यात सर्वांसाठी एक नवा आदर्श निर्माण करणारी घटना समोर आली आहे.

धुळे शहरातील जुनं धुळे येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. मात्र, धुळ्यातील तृतीय पंथियांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करत एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे.

मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी तृतीयपंथी समाजाचे महामंडलेश्वर रवी नाथजोगी तसेच यलम्मा रेणुका देवी मंदिराच्या जोगतींनी स्वतःहून पुढाकार घेत, मनात कोणतीही भीती न बाळगता पुढे आल्या. या सर्वांनी मिळून कोरोनाबाधितावर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्याबरोबरच, कोरोनाबद्दलची भीती दूर करत किमान शेवटच्या क्षणी तरी नातेवाईकांना बेवारस सोडू नका, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

तृतीयपंथीयांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर, महानगरपालिका कर्मचारी भारत येवलेकर, महेंद्र साळवे आणि रुग्णवाहिका चालक अबू अन्सारी हे देखील यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह

बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!