कोरोनाच्या विळख्यात सापडला ‘हा’ प्रसिद्ध कोरिओग्राफर

मुंबई |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.

त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींनाही कोरोनाची लगाण झाली आहे. अशातच प्रसिद्ध कोरिओग्राफर, डान्स दिवाने 3 या रियालिटी शो चा परिक्षक धर्मेश येलंडे याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती समोर आली आहे.

डान्स दिवाने 3 या रियालिटी कार्यक्रमात होणाऱ्या धमाकेदार डान्समुळे सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. परंतू काही दिवसांपूर्वी शोच्या सेटवरून ध.क्कादायक माहीती समोर येत आहे. सेटवरील 18 क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आणि आता धर्मेशही कोरोनाबाधित असल्याची माहिती सेटवरील काही लोकांनी  दिली आहे.

या रियालिटी शोमध्ये माधुरी दिक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलंडे हे तिघं परिक्षक आहेत. या कार्यक्रमाचं अॅकरिंग राघव जुयाल करतो. धर्मेश पॉझिटिव्ह आल्यानंतर तुषार आणि माधुरी या दोघांनी तातडीने कोरोनाची टेस्ट करून घेतली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचं समजतं आहे.

करोनाची लागण झाल्यामुळे धर्मेशच्या चाहत्यांना मोठा ध.क्का बसला आहे. तसेच येणारे काही दिवस या कार्यक्रमाचा धर्मेश हिस्सा नसणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनी टिव्हीने एक प्रोमो शेअर केला होता. त्यामध्ये धर्मेश दिसत नसून त्याच्याऐवजी प्रोमोमध्ये पुनीत पाठक आणि शक्ती मोहन पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या या विळख्यात अनेक बॉलिवूड स्टार्स अडकले आहेत. अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफ हिलाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तसेच राज्यात लसीकरणाची मोहीम सुरू असून, लसींचा साठाही आता कमी पडायला लागला असल्याची माहिती समोर येतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंधनांच्या किंमतींमुळे गाडी चालवणं परवडत नाही? मग…

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने…

अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

‘ओ तेरी’! अनुष्कानं पति विराटला एकदा नाहीतर…

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy