इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट

मुंबई | सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त ‘बेल बॉटम’ या चित्रपटाची. अक्षय कुमारचा हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जिवनावर आधारीत आहे. सध्या या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.

मिस युनिव्हर्स असणारी लारा दत्ता या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका निभावत आहे. लारा दत्ताला आजपर्यंत दर्शकांनी ग्लॅमरस भूमिका करताना पाहिलं आहे. मात्र, अशी भूमिका लारा प्रथमच साकारत आहे.

लाराला ज्यावेळी इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, त्यावेळी तिला देखील शॉक लागला होता. मात्र, त्याबरोबरच लाराला आनंद देखील झाला होता. ही भूमिका करण्यासाठी लारा खूप उत्सुक होती. कारण तिचे वडील इंदिरा गांधींचे पर्सनल पायलट होते.

याबद्दल लाराने स्वतः एका मुलाखतीत माहिती दिली आहे. लाराने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, लाराचे वडील एक सैनिक होते. हवाई दलात विंग कमांडर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे.

तसेच ते इंदिरा गांधींचे पर्सनल पायलट देखील होते. इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी या गोष्टीची लाराला खूप मदत झाली. लाराला तिचे वडील लहनपणापासून इंदिरा गांधींच्या कथा सांगत.

वडिलांकडून इंदिरा गांधींविषयी मिळालेले इनपुट्स लाराला खूप उपयोगी ठरले. वडिलांनी दिलेल्या माहितीमुळे ती या भूमिकेला पुरेपूर न्याय देऊ शकली, असं देखील लाराने यावेळी सांगितलं आहे. लारा सांगते की, ही भूमिका साकारण्यासाठी तिने इंदिरा गांधींच्या अनेक मुलाखती पाहिल्या. त्यांच्यासारखे हुबेहूब हावभाव आणण्यासाठी कठीण परिश्रम घेतले.

तसेच यावेळी बोलताना लारा म्हणाली की, मी एका सैनिकाची मुलगी असल्यामुळे माझ्या रक्तातच देशभक्ती आहे. मला लहानपणापासून देशभक्तीचे धडे मिळाले आहेत. यामुळे ही भूमिका करताना मी खूप आनंदी आहे.

महत्वाच्या बातम्या-

जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल

विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन