नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक भांडणांचे, हाणामारींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही खूपच भयंकर असतात. तर काही अंगावर काटा येतील असतात.
आपल्याला कोणी बोललं तर लगेच आपण आरेला कारेची भाषा करतो. चूक असली तरी आजकाल कोणी कोणाच ऐकून घेत नाही. परंतू सगळेजच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते की, तिने काहीही केलं तरी आपण तिला काहीही बोलत नाही. ती व्यक्ती म्हणजे दूसरी-तिसरी कोणी नसून ती आपली आई असते.
आपण सगळ्यांनीच लहानपणी एखादी चूक केल्यावर आपल्या आईच्या हातचा मार खाल्लाच असेल. आई जरी आपल्या मुलाला मारत असली तरीही तिच्या मनाला खूप वेदना होत असतात. परंतू काय तुम्ही एखाद्या आईला दुसऱ्याच्या चूकीची शिक्षा आपल्या मुलाला देताता कधी पाहिलं आहे का?.
नसेल पाहिल तर सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांनी केलेल्या चुकीच्या शिक्षा आई आपल्या पोटच्या मुलाला देताना दिसतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आई आणि मुलगा स्वयंपाक घरामध्ये असतात. आई किचन ओटा एका कापडाने स्वच्छ करत असती. म्हणजेच पुसत असती. त्याचवेळी डाईनिंग टेबलला टेकून मुलगा आपला फोन हातात घेऊन त्यामध्ये काहीतरी करत उभा आहे. त्यावेळी बाहेरून त्या मुलाचे वडिल हातात टोमॅटो सॉसची बाटली घेऊन घाई-घाईत किचनमध्ये येतात.
मुलाच्या आईच लक्ष नसताना बाटलीच झाकण खोलून त्यातील सॉस स्वच्छ केलेल्या ओट्यावर टाकतात. त्यानंतर ते लगेचच बाहेर निघून जातात. वडिल हे सगळ करत असताना, त्या ठिकाणी असलेल्या मुलाचं त्यांच्याकडे थोडंसुद्धा लक्ष जात नाही. तो आहे त्याच ठिकाणी आपला फोन पाहत उभा असतो.
काही वेळानंतर मुलाच्या आईचं त्या सांडलेल्या सॉसकडे जातं आणि ती मागे पाहती तर तिथे तिचा मुलगा उभा असतो. तिला वाटतं की तो सॉस मुलानेच सांडवला आहे. ती त्याला ते दाखवती मुलगा काही बोलायच्या आतच ती त्याला लाथा, बुक्क्या मारून किचनच्या बाहेर काढते.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘हेपगुल’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही दिल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल
प्रेम विवाहाला पाठिंबा दिला म्हणून दोघा भावांना मिळाली ‘ही’ अजब शिक्षा, वाचा सविस्तर
तुम्हीही ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर, ‘हा’ व्हिडीओ नक्की बघा
ऐकावं ते नवलंच! लग्नात वऱ्हाडी म्हणून चक्क ‘या’ प्रण्यांनी लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
नवरदेवाला पाहताच भर मंडपात नवरीने धरला ठेका अन् मग…; पाहा व्हिडीओ