मुंबई | ‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आता ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट येत आहे.
ठाण्यात शिवसेनेला मोठं करणारं एकमेव नावं म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या कार्यामुळे आणि व्यक्तीमत्वामुळे त्यांना गुरुवर्य आणि धर्मवीर अशा नावाने लोक ओळखू लागले.
खिश्यात रूपया नसताना लाखो लोकांची मदतीचा हात देणारे आनंद दिघे थोड्यात काळात अनेकांच्या मनात घर निर्माण करून गेले. आजही शिवसैनिकांमध्ये आनंद दिघे यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं.
2001 मध्ये त्यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यावेळी लोकांच्या मनात संताप होता. संतप्त लोकांनी थेट रूग्णालयाला आग लावल्याची घटना त्यावेळी घडली होती.
धर्मवीर ते हक्काचा माणूस म्हणून आनंद दिघे यांची ओळख आहे. बाळासाहेबांच्या मर्जीतले नेते आणि एकनिष्ठ आनंद दिघे यांनी शिवसेनेला घडवण्यास मोलाची साथ दिली.
अशाच या दिलदार नेत्यावर आता धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट येत आहे. चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
तर प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या रिलीज करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त या ट्रेलरचीच चर्चा होताना दिसत आहे.
पाहा ट्रेलर-
महत्त्वाच्या बातम्या-
नवाब मलिकांना धक्क्यावर धक्के! अटकेनंतर आता ईडीने मोठी कारवाई केली
“उद्धव ठाकरेंना भेटलो…”, शिवसेना-वंचित युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत खळबळजनक माहिती समोर!
मंत्री धनंजय मुंडेंच्या तब्येतीसंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती!
“राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”