“जावयामुळे येडा झालेला जगातला पहिला सासरा, वर्गणी काढून वेड्याच्या…”

मुंबई | गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण ड्रग्ज प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आता नवाब मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी नवाब मलिकांवर आक्रमक टीका करण्यास सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या आरोपावर उत्तर देत दिवाळीनंतर बाॅम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं.

फडणवीसांनंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील नवाब मलिकांवर घणाघाती टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला.

नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा असल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. नबाब मलिक डोक्यात वारा शिरल्यासारखं रोज बरळत आहेत, अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे.

तुमच्या हाती पुरावे असतील तर न्यायालयात जा. नाहीतर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा, अशी खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आम्हाला शिकवलं होतं की राजकारणाची पातळी ओलंडायची नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर देखील भातखळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत हा एकदम भला माणूस आहे. पण प्राॅब्लेम एकच आहे की, ते कधी खरं बोलत नाही, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना उत्तर दिलं आहे.

एकीकडे ठाकरे सरकारच्या आजी माजी मंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणाच्या तपासाचा फास घट्ट होऊ लागला आहे. कारवाया पुराव्यांच्या आधारेच होतात. देशमुखांच्या अटकेनंतर राज्यात कदाचित संघर्ष नाट्याचा शेवटचा अंक सुरू झाला आहे, असं सुचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

आम्हीही अंडी उबवली होती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे आता घरकोंबडे आहेत हे त्यांनी मान्य केलंय, अशी टीका भातखळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, शिवसेनेने परमबीर यांच्या सोबत झालेले डील उघड करावी, त्यासाठी त्यांना अजूनही पदावर ठेवलं आहे. मग कोणासाठी अभय मागितले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडीचा एक-एक कोना ढासळतोय, आता येणाऱ्या काळात…”

“मग तो एवढा प्रामाणिक कसा? हे तर मोदींच्या वर झालं”

पुढील 3,4 दिवसांत कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

  “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”