‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर

मुंबई | कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन(Omicron) राज्यात आपले हातपाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

आज सुद्धा राज्यात 26 ओमिक्रॉनचे (Maharashtra Omicron) रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. अशात ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये घशाच्या खवखवण्याचा समावेश होतो. तुमच्या घशाला आतून सतत काहीतरी टोचल्याची जाणीव होते, असं तत्ज्ञांनी सांगितलंय.

ओमिक्रॉनचा त्रास असलेल्या लोकांना नाक चोंदणं, कोरडा खोकला आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील डिस्कव्हरी हेल्थचे मुख्य कार्यकारी रायन रोच यांनी सांगितलं आहे.

जर तुमचा आवाज खराब झाला असेल. जर तुम्हाला ओरडता येत नसेल किंवा गाणं गाता येत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते. कारण, हे ओमायक्रॉनचं सर्वात सुरुवातीचं लक्षण आहे, अशी माहिती आहे.

दरम्यान, जगावर असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे.

ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंतओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 400 पार गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं” 

फुकट दिलं तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे, त्यामुळे…- नितीन गडकरी 

डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense” 

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी